आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटोदा ईश्वराने आत्तापर्यंत सर्व काही भरभरून दिले. मागील अनेक वर्षांपासून ईश्वराची कृपा व आपणा सर्वांचे आशीर्वाद व सदिच्छा यांच्या बळावर निर्विघ्नपणे आत्तापर्यंत रुग्णसेवेची संधी मिळाली हेच माझ्या जीवनातील यश आहे. पाटोदा नगरीत झालेला माझा सत्कार हा अविस्मरणीय आहे. अखंड रुग्णसेवेचे व्रत हीच आपल्यासाठी ईश्वर सेवा आहे, असे प्रतिपादन संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.पराग संचेती यांनी केले. पाटोदा येथे डॉ.रवींद्र राजपुरे यांच्या पुढाकारातून अस्थिरोग तपासणी शिबिर पार पडले.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.संचेती बोलत होते. पाटोदा नगरपंचायत व नागरिकांच्या वतीनेही डॉ.संचेती, डॉ.प्रमोद भिलारे व सर्व टीमचा सत्कार करण्यात आला. डॉ.रवींद्र राजपुरे यांनी डॉक्टर पराग संचेती हे स्वतः पाटोदा शहरात रुग्ण तपासणीसाठी आले हे आपले सर्वांचे भाग्य असून यापुढेही ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अशा प्रकारच्या शिबिराच्या आयोजन केले जाईल, असे सांगितले. स्वागताला उत्तर देताना डॉ.पराग संचेती यांनी डॉ.राजपुरे तसेच आयोजकांचे आभार मानून या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी प्रत्येक महिन्याला संचेती हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टीम तपासणीसाठी पाठवणार असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ.जाधव, पोकळे, सुरवसे, इम्रान शेख, अमीन शेख, डिडूळ, सुसलादे, तांदळे यांच्यासह पाटोदा नगरपंचायतचे गटनेते बळीराम पोटे, नगरसेवक संतोष जाधव, मंत्रालयीन अधिकारी सुनील कोठेकर, युवा नेते शहानवाज शेख, माजी उपनगराध्यक्ष नयुम पठाण, सभापती रामेश्वर गोरे, हनुमंत काळे, नगरसेवक सुशील कोठेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर घुमरे, संदीप जावळे हजर होते. सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक एल. आर. जाधव यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.