आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात यंदा जून महिन्यात १५ दिवस पाऊस लांबaणीवर गेला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला, पण तो पेरणी योग्य नाही. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात यंदा एकूण ७ लाख ८५ हजार ७८९ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १६ हजार ४३६ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मागील पंधरा दिवसांत कपाशीची जिल्ह्यात १० हजार ७८ हेक्टरवर, तर सोयाबीनची एक हजार ७२ हेक्टरांवर पेरा झालेल्या आहे. दमदार पाऊस नसल्याने पाटोदा आणि केज तालुक्यात पेरणीच झाली नसल्याची नोद जिल्हा कृषी विभागाकडे आहे. पाऊस लांबणीवर जात असल्याने सोयाबीनचे क्षेत्र वाढेल असा अंदाज शेतकऱ्यांतून वर्तवला जात आहे.
खरिपामध्ये सर्वाधिक पीक हे कपाशीचे आणि त्या पाठोपाठ सोबयानीचे होईल, असा अंदाज कृषी अधिकाऱ्यांकडून वर्तवला जात आहे. मात्र, जून महिन्यात अद्यापपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सर्व तयारी करून ठेवली. मात्र, जोरदार पाऊस होत नसल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात मागील वर्षी कपाशी लागवडीचे क्षेत्र हे २ लाख ६४ हजार ७१ हेक्टर एवढे होते. तर सोयाबीनचा पेरा ३ लाख १५ हजार हेक्टर असा होता. यंदा जिल्ह्यातील १७ जून अखेरपर्यंत १० हजार ४३६ हेक्टरांवर पेरण्या झाल्या आहेत.
या तालुक्यात असतो सर्वाधिक कपाशी, सोयाबीनचा पेरा
अंबेजागाई, केज, परळी या तीन तालुक्यात सोयाबीन या मुख्य पिकाकडे शेतकऱ्यांचा कल असतो, तर बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, गेवराई, माजलगाव, धारूर, वडवणी या तालुक्यांमध्ये कपाशीची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात.
योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी
बीड जिल्ह्यात सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात सरासरी २१ जूनपासून शेतकरी पेरणीच्या कामाला लागताे. सध्या सरासरी २ टक्के पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पेरणीची कामे करावीत.
-बी. के. जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.