आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या बीड शहर कार्यकारिणीची बैठक पार पडली. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार व परिचय घेण्यात आला. ही बैठक बीड शहरातील पक्षाचे संघटन शाखा व बुथबांधणी संदर्भात घेण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते बबनराव वडमारे हे या बैठकीचे अध्यक्ष होते. या बैठकीला मार्गदर्शन करत असताना त्यांनी बीड शहर कार्यकारिणीच्या पदाधिकारी यांना प्रभाग निहाय बूथ बांधणी व शाखा स्थापना कार्यक्रम सुरु करण्याच्या सूचना केल्या.
तसेच कार्यकारिणीचे शहराध्यक्ष लखन जोगदंड हे बोलताना म्हणाले येणारा काळ निवडणुकांचा आहे तरी शहर कार्यकारणीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात बैठकांचे नियोजन करून शाखा व बुथबांधणी सुरू करावी माजी जिल्हा सदस्य अजय सरवदे यांनी देखील जमलेल्या शहरातील पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले या बैठकीला जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर जिल्हा सहसचिव पुरुषोत्तम (गोटू) वीर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी जगतकर, सुशील काकडे शहर उपाध्यक्ष, स्वप्निल सदाफुले शहर सहसचिव, प्रकाश पवळे शहर सहसंघटक, राजेशकुमार जोगदंड शहर प्रसिद्धीप्रमुख, शहर सदस्य रोहित पटेकर, दीपक जावळे, रोहित वीर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शहराचे महासचिव संदीप जाधव यांनी केले, तर शहर संघटक योगेश शिंदे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.