आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:योगेश्वरीच्या मैदानावर वारकरी दिंडी स्पर्धा ; अंबाजोगाईत 28 जूनला  अश्वारूढ रिंगण सोहळा

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षांपूर्वी न होऊ शकलेला संत जनाबाई व संत नामदेव महाराज या गुरू-शिष्यांच्या पालखी सोहळ्यातील अश्वारूढ रिंगण सोहळा यंदा अंबाजोगाईकर व भाविकांच्या उपस्थितीत येत्या २८ जूनला दुपारी चार वाजता अंबाजोगाईत रंगणार आहे. सध्या या रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. गंगाखेड (जि. परभणी) येथून संत जनाबाई संस्थानची पालखी अंबाजोगाई मार्गे पंढरपूरला जाते. याच मार्गे हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव नामदेव महाराजांची पालखीही पुढे जाते.

संत जनाबाई व संत नामदेव महाराज दोन्ही गुरू-शिष्याच्या पालख्या अंबाजोगाईत एकाच दिवशी येतात. अंबाजोगाईत गुरू-शिष्यांची भेट होऊन येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन्ही पालख्यांचा अश्व रिंगण सोहळा येथे रंगणार आहे.

या रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी उपस्थित राहून आषाढी वारीचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, बाबा महाराज जवळगावकर, दिलीप सांगळे, दिलीप गित्ते, प्रकाश बोरगावकर, सारंग पुजारी, बळीराम चोपणे, डॉ. निशिकांत पाचेगावकर, कल्याण काळे, अनंत अरसुडे, वैजनाथ देशमुख, अनिकेत दिघोळकर, अमोल घोडके, संत श्रेष्ठ सावता महाराज भजनी मंडळ, अंबाजोगाई, महारुद्र महाराज खाडे, शिवगड वारकरी संस्थान, कृष्णा महाराज रेवले, गोविंद महाराज सुक्रे, संत आद्यकवी मुकुंदराज वारकरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई यांच्यासह संयोजन समितीने केले. सोहळा यशस्वितेसाठी अंबाजोगाईतील सर्व वारकरी मंडळी, विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना, नियोजन समिती प्रयत्नशील आहेत.

योगेश्वरीच्या मैदानावर वारकरी दिंडी स्पर्धा
यंदाच्या रिंगण सोहळ्यात पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योगेश्वरीच्या मैदानावर वारकरी दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही स्पर्धांसाठी या स्पर्धेत २१०० रुपयांचे प्रथम बक्षीस, तर १५०० रुपयांचे द्वितीय, एक हजार रुपयांचे तृतीय आणि उत्तेजनार्थ ५०० रुपयांच्या दोन बक्षिसांसह प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...