आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या चौकशीसाठी उपोषणाचा इशारा

धारुर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर तालुक्यातील गोपाळपुर या ग्रामपंचायत मध्ये गेल्या तीन वर्षात झालेल्या अनागोंदी भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यावर २१ मे पर्यंत कारवाई करावी अन्यथा २३ मे रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे तेथील ग्रामस्थ यांनी गटविकास अधिकारी कांबळे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे

धारुर तालुक्यातील गोपाळपुर या ग्रुप ग्रांपचायत अंतर्गत ग्रामीण धारूर (झोपडपट्टी-चडारवाडी) शिक्षक कॉलनी, भायजळी, गोपाळपुर हा भाग येत असुन शिक्षक कॉलनी ग्रामीण धारूर (झोपडपट्टी-वडारवाडी) हा भाग गेल्या २० वर्षापासुन गोपाळपुर ग्रामपंचायतमध्ये येत असून येथील नागरीक शासनाच्या सर्व विविध योजने पासुन मुलभूत सुख सुविधेपासून वंचित आहे. सदरील भागातील नागरीकांना गेल्या २० वर्षापासुन पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते.

नगर परिषद किल्ले धारूर ची जुनी पाईप लाईन होती त्याद्वारे १५ दिवसाला एक वेळ पाणी मिळत होते परंतु त्या पाईप लाईनवर नवीन पाईप लाईन ग्रामपंचायत गोपाळपुर यांनी केल्यापासून या भागाला नगर परिषद किल्ले धारुर कडून होणारा पाणी पुरवठा खंडीत झाला असून सदरील याला गोपाळपुर ग्रामपंपचायत यांनी नव्याने केलेली पाईन लाईन जवाबदार आहे फक्त पैसे कमवण्यासाठी केल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत .

बातम्या आणखी आहेत...