आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:टाकाऊ 1500 बाटल्यांतून 400 झाडांना पाणी; बीडमध्ये वृक्षमित्र अभिमान खरसाडे फुलवतोय 4 वर्षांपासून शिवराई

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुक्यातील आहेरवडगाव या चार हजार लोकसंख्येच्या गावातील अभिमान खरसाडे या वृक्षमित्राने गावच्या साडेतीन एकरांतील खडकाळ डोंगरावर चार वर्षांपासून शिवराई वन प्रकल्प फुलवला आहे. हॉटेलवर मिळालेल्या दीड हजार प्लास्टिकच्या बाटल्या पावसाळ्यात पाण्याने भरून मागील एक वर्षापासून शिवराईतील चारशे झाडांना सलाइन पद्धतीने देत आहे. उन्हाळ्यात झाडांना वाचवण्यासाठी ग्रामीण भागातील वृक्षमित्राचा हा संघर्ष पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रेरणादायी ठरत आहे. चार हजार लोकसंख्येच्या आहेरवडगावात साडेनऊशे एकरांत सरकारी डोंगर तर साडेबाराशे एकरवर खासगी डोंगर आहे. वृक्षमित्र अभिमान खरसाडे यांनी आठशे दुर्मिळ वृक्षांची रोपवाटिका तयार करत लॉकडाऊनमध्ये या राेपवाटिकेतील एक-एक रोप शिवराई प्रकल्पावर रोज आठ किलोमीटर पायी जाऊन लावले. त्यांची झाडे वाचवण्याची धडपड पाहून गावातील ६२ हेक्टरवरील डोंगरावर झाडे लावण्यासाठी ग्रामपंचायतीने खरसाडे यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले असल्याने ते आता पावसाळ्यात झाडे लावणार आहेत. सध्या प्रकल्पात साडेतीन फूट उंचीची साडेतीनशे झाडे आहेत.

उन्हाळ्यात कशी जगवतात झाडे : आता काठेवाडी पाझर तलावातून एक दिवसाला चारशे लिटर पाणी दुचाकीवरून कॅनने आणून झाडांना देण्यात येत आहे. या प्रकल्पावर एकूण दीड हजार झाडे आहेत.

पर्यावरणाचा विषय कळावा म्हणून बालकथासंग्रह लिहिला
अभिमान खरसाडे यांनी पर्यावरण संवर्धन व प्रबोधन ही लिहिलेलली पुस्तिका तीन हजार पर्यावरणप्रेमींना मोफत दिली. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा विषय साध्या सोप्या भाषेत कळावा म्हणून ‘निसर्गाचे देणं’ हा आठ बालकथा असलेला संग्रह लिहून त्याच्या दोन हजार प्रती स्वखर्चाने छापून माजलगाव, वडवणी, बीड, गेवराई तालुक्यातील विद्यार्थ्यांना भेट दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...