आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाळवंडी गटातील गावांत जल योजना; बाभळखुंटा, काळेगाव हवेली, ढेकणमोह्यात सुरुवात; बाभळखुंटा, काळेगाव हवेली, ढेकणमोह्यात सुरुवात

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड मतदारसंघातील नाळवंडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये असलेल्या बाभळखुंटा, काळेगाव हवेली, ढेकणमोह तसेच बहीरवाडी जिल्हा परिषद सर्कलमधील उमरद (खा.) या गावांमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन करत शुभारंभ करण्यात आला आहे.

या योजनेमुळे येथील जनतेचा पाणी प्रश्न मार्गी लागून घरोघर पाणी मिळणार असल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासमवेत माजी आमदार सुनील धांडे, कल्याण आखाडे, भाऊसाहेब डावकर, उत्रेश्वर सोनवणे, नंदकुमार कुटे, राधाकिसन म्हेत्रे, बाजीराव बोबडे, प्रकाशसिंग ठाकुर, दादासाहेब लांडे, चौरंगनाथ पवार, सुभाष गिराम, कचरू जाधव, संतोष पवार, संजय खुर्णे, बबलू जाधव, शहादेव बहीर, चव्हाण सरपंच यांच्यासह कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

भूमिपूजन झालेल्या गावांमध्ये प्रचंड पाणीटंचाईची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. पाण्याविना ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते.यामुळे या गावांचा नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये समावेश करत गावकऱ्यांचा मुलभूत प्रश्न मार्गी लावल्यामुळे गावकरी समाधानी झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

बातम्या आणखी आहेत...