आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात मागील अनेक वर्षापासून कधी आठवड्याला तर कधी महिन्यातून दोनदा पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून हा पाणीपुरवठा किमान रोज किंवा ४ दिवसआड तरी करावा अशी मागणी काही नगरसेवकांनी केली आहे. त्याचे निवेदन आमदार नमिता मुंदडा यांनी बुधवारी (दि.२३) नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
धरणात व तलावात मुबलक पाणी असतानाही शहरात मात्र नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. पालिकेकडून पाणीपट्टी मात्र महिनाभराची घेतली जाते. एकीकडे जलवाहिनीच्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. पाणी सुटल्यानंतर या गळतीमुळे रस्त्यावरून व नाल्यातून पाणी वाहते. परंतु, रोज पाणी नागरिकांना मिळू शकत नाही. त्यामुळे रोज शक्य नसेल तर किमान चार दिवसआड तरी नागरिकांना पाणी पुरवठा केला जावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. ही मागणी नगरसेवक सारंग पुजारी, शेख रहीम व काही नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली. या वेळी शेख नबी, डॉ. निशिकांत पाचेगावकर, अनंत अरसुडे, बाला पाथरकर, ताहेरभाई आदी उपस्थित होते. आमदार नमिता मुंदडा यांनी हे निवेदन जोडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.