आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैकशी:पाणीपुरवठ्याची कामे वादात, आता 11 पथकांमार्फत चाैकशी

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात जल जीवन मिशन प्रकल्पातून होत असलेली पाणी पुरवठ्याची कामे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. या कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार आहे. या प्रकरणात सीइओंनी एका वरिष्ठ सहायकाला निलंबित केले आहे. तर, उपअभियंत्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आहे. दरम्यान, आता जिल्हाधिकाऱ्यांनी ११ पथकांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक पथकात एक प्रमुख व तीन सहायक आहेत.

बीड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत केंद्र शासनाची जल जीवन मिशन ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे. मात्र, ही योजना राबवताना झालेल्या घाईमुळे आता नवीन वाद सुरु झाले आहेत. काही अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करुन आपल्या जवळच्यांना निविदा प्रक्रियेत नियमबाह्यपणे सामाविष्ठ करुन घेतले. नातेवाईकांनाच कामे दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पंकजा मुंडेंसह आमदार लक्ष्मण पवार यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. विभागीय आयुक्तांनीही या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली होती.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी ११ पथकांची स्थापना केली असून यात प्रत्येकी ४ अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. एकूण ४४ जण जल जीवन मध्ये झालेल्या अनियमिततेची तपासणी करणार आहेत. पथक प्रमुख म्हणून कार्यकारी, उपकार्यकारी अभियंते आहेत तर त्यांना अभियंते सहकारी असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...