आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:जुनी पेन्शन प्रकरणी दडपशाहीच्या‎ निषेधार्थ केले टरबूज आंदोलन‎

बीड‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी १४‎ मार्चपासून राज्य सरकारी कर्मचारी संपावर जात‎ अहोत. मात्र, सरकारने मेस्मा कायदा लागू करुन‎ दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरु केला असून‎ याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश‎ ढवळे यांच्या नेतृत्वात टरबुज आंदोलन केले.‎ राज्यातील शासकीय, निमशासकीय,‎ कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागु‎ करण्यात यावी या प्रमुख मागणीसह शासन‎ तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी‎ आमदारांचे निवृत्तीवेतन बंद करण्यात यावे.

तसेच‎ १४ मार्च पासुन पुकारलेला बेमुदत संप मोडुन‎ काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा‎ परीरक्षण (मेस्मा) कायदा लागु करण्यासाठी‎ विधेयक घाईघाईत मांडण्याच्या सरकारच्या‎ धोरणाच्या निषेधार्थ व बेमुदत संपाला पाठिंबा‎ देण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे‎ कार्याध्यक्ष डाॅ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टरबूज आंदोलन‎ करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...