आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाव्हळ:कायम विनाअनुदानित शाळा समिती जिल्हाध्यक्षपदी वाव्हळ

बीड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी आत्माराम वाव्हळ यांची निवड करण्यात आल्याचे कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर जाहीर केले.

या निवडीचे निवड पत्र जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पैठणे, रसाळ, कृती समितीचे विभागीय अध्यक्ष जितेंद्र डोंगरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. मागील १२ ते १३ वर्षांपासून संघटनेमध्ये सक्रिय राहून काम केल्याबद्दल महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे आत्माराम वाव्हळ यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी वाव्हळ हे या निवडीला आपल्या कार्यातून निश्चितपणे न्याय देतील, असे सांगितले. कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या माध्यमातून विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे प्रयत्न करत असल्याचेही जगदाळे यांनी सांगितले. यासह इतर मान्यवरांनीही आपली भूमिका मांडली.

याप्रसंगी वाव्हळ यांनी आपण संघटनेने ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे सांगितले. तसेच विविध उपक्रम पारदर्शकपणे राबवण्यात येतील, असेही सांगितले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे बीड जिल्हाध्यक्ष पैठणे रसाळ, संघटनेचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष जितेंद्र डोंगरे, भागवत यादव, अभिषेक राऊत, बाळासाहेब नागरगोजे, विकास येडे, प्रदीप गाडे, लक्ष्मण इंगोले, पवार, सूर्यकांत धुरवडे, विलास येडे, सय्यद, कदम, पंकज कळसकर आदींसह पदाधिकारी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...