आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण आपल्या स्वरूपाला विसरलो, संसारच करीत राहिलो, त्यामुळे पाप वाढून भगवंताचा साक्षात्कार झाला नाही. साक्षात्कार होण्यासाठी पापनिवृत्ती होणे आवश्यक आहे म्हणून त्याचे निवर्तक नाम आहे म्हणून नामस्मरण करून त्याने पाप जळून जाईल. ते पाप नामस्मरणाने नाहिसे होते म्हणजेच नामसंकीर्तन हे पाप निवृत्तीचे सर्वात सोपे साधन आहे असे प्रतिपादन लक्ष्मण महाराज मेंगडे मठाधिपती बंकटस्वामी संस्थान निनगूर यांनी श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे प्रारंभिक कीर्तनात केले.
बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे सदगुरु श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त तपोनिधी शांतिब्रम्ह गुरुवर्य महादेव महाराज (तात्या) श्रीक्षेत्र चाकरवाडी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील प्रारंभिक कीर्तनात एक गावे आम्ही विठोबाचे नाम| आणिकांपे काम नाही आता ||१||या संत तुकाराम महाराज यांच्या ४ चरणी अभंगातून लक्ष्मण महाराज मेंगडे मठाधिपती बंकटस्वामी संस्थान निनगुर हे नामस्मरणाचे प्रयोजन सांगतात.
आपल्या अभंग निरूपणातून बोलतांना लक्ष्मण महाराज मेंगडे म्हणाले की, संत माऊली दादा हे २० व्या शतकांतील महान संत होऊन गेले आहेत.संपूर्ण जगाला लीनता ही काय असते हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलेलेआहे. कोणीही वयाने लहान, मोठा त्यांच्याकडे जाणारा असो माऊली दादा त्यांचे दर्शन घेत असत. ही किती नम्रतेची अगाध महिमा होती. त्यांच्या कार्यकाळात अखंड नामस्मरण व अविरतअन्नदान होत असे ते आजही तात्यांच्या कार्यकाळात अखंड चालू आहे. माऊलीदादांच्या कीर्तनातून लोकांना साक्षात ब्रम्हरसाचे भोजन मिळत असे.
यावेळी गायक म्हणून बीबिषण कोकटे, हरिभाऊ काळे, अभिमान ढाकणे,ओंकार जगताप, सोपान काका बोबडे व मृदंग वादक तालमहर्षी राम महाराज काजळे तर नारायणमहाराज उ.पिंपरी, महादेव महाराज तात्या चाकरवाडी, नवनाथ अं.पिंपरी, किसन पवार , रामहरी रसाळ गुरूजी, अनंत घिगे , नानासाहेब काकडे पाटील, दिनेश काळे, रणजित शिंदे, अनिल कराळे, राम गायकवाड, नामदेव गिरी असे असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.
संतांनी नामस्मरण हा सोपा मार्ग खुला करून दिला...
भगवंतप्राप्तीचे अनेक साधने आहेत त्यात कर्म, योगमार्ग ही होत.कर्ममार्ग हा अत्यंत शूक्ष्म व अवघड आहे, खर्चिक आहे, मनुष्यबळ लागते तर योगमार्ग हा अत्यंत कठीण व दुस्तर असल्याने सर्वांना हे करणे अवघड म्हणून हे मार्ग संतांनी खंडित करून नामस्मरण हा सोपा मार्ग खुला केला.यामार्गाने जाण्यासाठी सात्त्विक वाद्यांचा वापर करून नामसंकीर्तन हा संप्रदाय घालून दिला. या मार्गाने जाणाऱ्यांना महापातकी असला तरी तो जीवन मुक्त होतो असेही लक्ष्मण महाराज मेंगडे या वेळी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.