आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:आम्ही कधीच दहशतीचे राजकारण केले नाही : मंगल सोळंके‎

माजलगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्व. सुंदरराव सोळंके यांच्या‎ कार्यकाळापासून माजलगाव मतदार संघात‎ सोळुंके घराण्याने ६० वर्षे राजकारण‎ समाजकारण केलं आहे. सुसभ्य आणि‎ सुसंस्कारपणा हा आमच्या राजकारणाचा‎ आणि समाजकारणाचा स्थाई भाव आहे.‎ शेजुळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा‎ आमचा काहीच संबंध नाही.संबंधित‎ घटना निषेधार्थच आहे.दहशतीचे‎ राजकारण आम्ही कधीच केले‎ नाही.जागतिक महिला दिनी हाच का माझा‎ सासरी सन्मान असा भावनिक सवाल‎ उपस्थित करत,मारहाण प्रकरणात जामीन‎ मिळताच मंगल प्रकाश सोळंके यांनी‎ पत्रकार परिषदेत भावना व्यक्त केल्या.‎ अशोक शेजुळ मारहाण प्रकरणात‎ जामीन मिळतातच लोकनेते सुंदरराव‎ सोळंके नागरी पतसंस्थेत बुधवारी‎ संध्याकाळी पत्रकार परिषद आयोजित‎ करण्यात आली होती.

यावेळी राष्ट्रवादीचे‎ तालुकाध्यक्ष जयदत्त नरवडे,एडवोकेट‎ बी.आर.डक,राहुल लंगडे उपस्थित होते.‎ यावेळी मंगल सोळंके म्हणाल्या,‎ मतदारसंघात आम्ही पोट,पाणी भरण्याच्या‎ योजनेने आलो नाहीत.मतदारसंघाचे‎ आम्ही काही देणे लागतो. या भावनेतून या‎ ठिकाणी काम करत आहोत.लोकनेते‎ सुंदरराव सोळंके साहेबांच्या संस्कारातून‎ आम्ही या ठिकाणी कारखान्याच्या‎ माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान‎ उंचावले आहे.तरुणांना रोजगार उपलब्ध‎ करून दिला आहे.दर्जेदार शिक्षण देण्याचा‎ प्रयत्न केला आहे.

त्याचप्रमाणे महिला‎ सबलीकरणासाठी महिला बचत गटाच्या‎ माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक‎ दृष्ट्या सक्षम केले आहे.अनाथ मुलांसाठी‎ काम करीत आहोत.सामाजिक भावनेची‎ जाणीव ठेवून सतत सोळंके घराणे या‎ ठिकाणी काम करत आहे. या वीस वर्षाच्या‎ आमदारकीच्या काळात आम्ही कधीच‎ दहशतीचं राजकारण या ठिकाणी केलं‎ नाही.आम्ही लोकशाहीचा आदर करून‎ कायद्याने आपली लढाई लढणारी लोक‎ आहोत. या प्रकरणात सोळंके घराण्याला‎ विनाकारण गुंतवून या ठिकाणी सुडाचे‎ राजकारण केल्या जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...