आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:गावच्या विकासाला नेतृत्व काय देते याचा विचार होणे गरजेचे; प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या गावचा विकास करून घेत असताना आपण कोणाचे नेतृत्व मान्य करावे, त्याच्याकडून आपल्या पदरात नेमके काय पडते, आपल्या गावचा विकास होतो की नाही याचा विचार स्थानिक नेतृत्वाने करायला हवा. राजकारणात चढ-उतार असतातच, पण निरंतर टिकणारे काय याचा विचार व्हायला हवा. विकास प्रक्रियेत आपण सातत्याने प्रयत्न करत राहतो त्यामुळेच आपण ही कामे करू शकतो. जनतेने आता त्याचा विचार करण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून ३ कोटी ३१ लाख रुपयांचे पालवण, बेलखंडी यंथील प्रत्येकी १ व चऱ्हाटा येथे २ पूल मंजूर केले आहेत. याचे उद्घाटन आणि वैद्यकिन्ही येथील विकास कामाचे भूमिपूजन मंगळवार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, विलास बडगे, दिनकर कदम, किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते, अरूण डाके, गणपत डोईफोडे, गंगाधर घुमरे, गोरख सिंघण, सखाराम मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्षीरसागर म्हणाले, चऱ्हाटा गावात आरोग्य केंद्राला वीज उपलब्ध नसल्यामुळे उपचार करण्यासाठी अडचणी येत आहेत हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. शासनाने अनेक योजनांच्या माध्यमातून पाणंद रस्ते, पाण्याचा प्रश्न, वीज आणि रस्ते यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता कामे होण्यास अडचण येणार नाही. सचिन मुळूक म्हणाले, अण्णांच्या पत्राने मुख्यमंत्री ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून कामे मंजूर केली.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे प्रतिपादन, चऱ्हाटा येथे विकासकामांचा केला शुभारंभ
चऱ्हाटा येथे आयोजित विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी बोलताना जयदत्त क्षीरसागर व अन्य. जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले, शिवसेनेला मोठे आणि खंबीर नेतृत्व लाभले आहे. येणाऱ्या काळात अण्णांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पाडण्यासाठी सर्वांनी गावोगावी तयारी करायला हवी.

बातम्या आणखी आहेत...