आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:तुमच्या वाटेतील काटे दूर करण्यासाठी आम्ही पाठीशी; मंत्री अब्दुल सत्तारांचे प्रतिपादन

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संघर्ष करावा लागेल, त्या शिवाय पदरात काही पडणार नाही. तुम्ही, चांगला निर्णय घेऊन मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय होत आहात. यापुढच्या काळात, तुमच्या वाटेतील काटे दूर करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी राहू, असे प्रतिपादन राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे केले.

बीड शहरात रविवारी (दि. ८) माजी मंत्री प्रा. सुरेश नवले मित्र मंडळ कार्यालयाचा उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महसूल मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार निम्हण, माजी मंत्री शिवाजीराव चौथे, माजी आमदार राजेंद्र जगताप, सिराजभाई देशमुख, जनार्दन तुपे, प्रा. सुनिल धांडे, सय्यद सलीम, अशोक हिंगे, बाबासाहेब मोरे,पप्पू कागदे, सुभाष राऊत, प्रा. सुशीला मोराळे , ॲड. बाळासाहेब राख, नवनाथ शिराळे, पंडित भुतेकर, गणेश उगले आदी उपस्थित होते. सत्तार म्हणाले की नवले मुलूख मैदानी तोफ असून त्यांना खूर्ची मिळावी, अशी भावना लोकांमध्ये आहे. दिलदार मित्र म्हणून त्यांचा मला अभिमान आहे. बीड जिल्हा नेत्याची खाण आहे.

मी कोणत्याही पक्षाचा म्हणून आलो नाही. एक मित्र म्हणून आलो आहे. निवडणुकीत खान बान म्हणून माझ्या विरोधात प्रयत्न झाले. परंतु मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी निवडून दिले. हा इतिहास निर्माण करणाऱ्या मावळ्यांचा मला अभिमान वाटतो. अनेक लोकांनी विचारले की जाणार का ? मी म्हणालो नक्कीच जाणार आणि वेळ आली तर प्रचाराला ही येईल, मुंह मे राम बगल मे छुरी, अशी भूमिका आम्ही कधी घेत नाही. त्यामुळे, तुमच्या संघर्षात माझा वाटा राहील, मी पुन्हा येईल, नक्की येईल, असा विश्वासही सत्तार यांनी शेवटी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...