आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधारूर किसान सभेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना शासनाकडून येणारे अनुदान आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूट यावर मार्गदर्शन करत आहेत. तसेच अनुदान आणि विमा मिळवून देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेला किसान सभा समोर जात असल्याने शेतकऱ्यांना अनुदान आणि विमा मिळण्याची प्रक्रिया गतिमान होताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी आणि किसान सभेचे महत्त्व पटवून देण्यासाठी बीड जिल्ह्यात किसान सभेच्या गाव कमिट्या स्थापन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.गांजपूर येथे किसान सभेची शाखा मोठ्या थाटात स्थापन करण्यात आली.
शेतकरी जगला तर देशाची अर्थव्यवस्था कणखर राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य भाव मिळाला पाहिजे तसेच खत बी बियाणे माफक दरात उपलब्ध झाले पाहिजेत. याबरोबरच शासन स्तरावरून नुकसान भरपाई म्हणून जाहीर होणार अनुदान हे शेतकऱ्यांना थेट खात्यावर तात्काळ मिळण्यात यावे. तसेच विमा कंपन्याकडून होणारी लुबाडणूक फसवणूक बंद करण्यासाठी किसान सभा राज्यभर आक्रमक झालेली पाहायला मिळते.
शेतकऱ्यांना किसान सदशिवाय अनुदान आणि विमा मिळवून देण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष प्रामाणिक प्रयत्न करत नसल्याचे सातत्याने दिसून येते. यामुळे आरोग्य भरातील शेतकऱ्यांनी किसान सभेमध्ये सहभागी होऊन किसान सभेची ताकद वाढवणे गरजेचे आहे. याचसाठी प्रत्येक गावागावात किसान सभेच्या शाखा स्थापन करण्याचं काम सुरू करण्यात आलेला आहे. धारूर तालुक्यातील मोठ्या थाटात किसान सभेची शाखा कॉम्रेड अजय बुरांडे यांच्या उपस्थितीत स्थापन करण्यात आली. यावेळीमोहन लांब, काशीराम सिरसट, अॅड.संजय चोले, दादासाहेब सिरसाट, जगदीश फरताडे, रामलिंग पिसुरे,आदीं सह मोठ्या प्रमाणावर गांजपूर, चिंचपूर व परिसरातील शेतकरी बांधव व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यांची झाली निवड भास्कर डापकर यांची शाखा अध्यक्षपदी, गीताराम सिरसट शाखा उपाध्यक्ष, दादासाहेब सिरसट शाखा सचिव, प्रकाश विटेकर कोषाध्यक्ष, सुनील डापकर कार्याध्यक्षपदी, काशीराम सिरसट गंगाराम डापकर, सदस्य, रणवीर डापकर, धनराज डापकर, रामदास डापकर, दत्तात्रय डापकर, रामेश्वर सिरसट, विलास डापकर, मधुकर समुद्रे, सखाराम घुगे, विश्वंभर गिरी, अच्युत डापकर, माणिक आगे, शिवराम सांगडे, राहुल डापकर, शाहूराव डापकर यांची निवड झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.