आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड हरिनाम:नवगण राजुरी येथे 29 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान सप्ताह

नवगण राजुरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रसिद्ध श्री मंगलमूर्ती देवस्थान येथे गणेश जन्मोत्सवानिमित्त सोमवार, २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात दैनिक कार्यक्रमात श्री गणेशास नित्याभिषेक पहाटे ४ ते ५ काकडा आरती, सकाळी १० ते १२ गाथा भजन, दुपारी ३ ते ५ गणेश पुराण, सायं. ५ ते ६ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकिर्तन, नंतर हरिजागर, भजन, भारूड होणार आहे. या सप्ताहात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे २९ ऑगस्ट रोजी हरिकीर्तन होणार आहे. ३० रोजी विनोदाचार्य अक्रुर महाराज साखरे, ३१ रोजी विनोदाचार्य ज्ञानेश्वर महाराज पठाडे, १ सप्टेंबर रोजी विनोदाचार्य प्रकाश महाराज साठे,२ रोजी विनोदाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे, ३ रोजी विनोदाचार्य विलास महाराज गेजगे , ४ रोजी विनोदाचार्य पुरूषोत्तम महाराज पाटील यांचे हरिकिर्तन होणार आहे. ३१ आॅगस्ट रोजी श्री गणेशास गंगेच्या कावडीने जलाभिषेक करण्यात येईल. ४ सप्टेंबर रोजी महाद्वारचा अनादिकाला होईल व पालखीची मिरवणूक काढण्यात येईल. सप्ताहाची सांगता ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत महंत शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल.

बातम्या आणखी आहेत...