आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसाराला आग:जानेगावात घर जळून संसार उघड्यावर; शेतकर्यानर आर्थिक संकट

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचानक लागलेल्या आगीत घरातील अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य, बैलगाडी, सायकल व इतर वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना तालुक्यातील जानेगाव येथे घडली. या घटनेत शेतकऱ्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून संसार उघड्यावर आला आहे.

जानेगाव येथील सतीश कुंडलिक शिंदे हे कुटुंबासह शेतात वास्तव्यास आहेत. दुसऱ्या शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टर आल्याने ते व त्यांचे कुटुंब ७ मे रोजी शेतात होते. घरी कोणी नसताना दुपारी अचानक घराला आग लागली. हे समजताच त्यांनी घराकडे धाव घेतली. पाणी टाकून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत घरातील ज्वारीचे ९ कट्टे, गव्हाचे ३ कट्टे, इतर संसारोपयोगी साहित्य, कपडे, फवारा, सायकल, बैलगाडी जळून खाक झाले. घरावरील पत्रांचेही नुकसान झाले. या आगीत अंगावरील कपडे वगळता सर्व काही जळून गेल्याने त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्यांचा संसार उघड्यावर पडला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामसेवकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. याची दखल घेऊन प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...