आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लगबग:कुठे पावसाची प्रतीक्षा; तर कुठे बळीराजाची पेरणीसाठी लगबग

धारूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृग नक्षत्राच्या सुरुवातीला धारूरमध्ये पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणापूर्व मशागतीची कामे उरकली. मंगळवारी सायंकाळी चोंडी, सोनिमोहा, धुनकवाड, थेटेगव्हाण, जहागिरमोहा, चोरंबा, पहाडी पारगाव, गावंदरा परिसरात अल्प पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली. मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास पिकाचा चांगला उतारा येतो असा शेतकऱ्यांचा अनुभव असल्यामुळे शेतकरी पेरणीत गुंतला आहे. शेतात रेखाटने व खताची पेरणी करून शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. तर काही शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

धारूरमध्ये डीएपी खतांचा तुटवडा आहे. शेतकऱ्यांनी मिळेल ती खते खरेदी करून पेरणीची घाई केली. तालुक्यात सध्या १२५९ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी मिश्र खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले. तालुक्यात खरिपाचे ३९,५४३ हे.क्षेत्र आहे. डोंगराळ परिसर बाजरी, मुगासाठी प्रसिद्ध असला तरी यंदा शेतकऱ्यांचा कल कपाशी, सोयाबीन या पिकांकडे दिसून येतेय.

परिसरातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा
धारूर तालुक्यात काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला असला तरी बहुतांशी बागांमध्ये अद्याप शेतात ढेकळं कायम आहेत, ते फुटलेले नाहीत त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

बातम्या आणखी आहेत...