आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎गुन्हा दाखल:बसमध्ये चढताना महिलेची‎ पर्स चोरट्याने लांबवली‎

केज‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केजहून अंबाजोगाई कडे निघालेल्या‎ महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने लांबवून‎ त्यातील नगदी २० हजार रुपये आणि ४३‎ हजार ५०० रुपयांचे दागिने असा ६३ हजार‎ ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना‎ घडली. याप्रकरणी केज पोलिसांत चोरीचा‎ गुन्हा दाखल झाला आहे.‎ अंबाजोगाई शहरातील कुलस्वामिनी‎ कॉलनी भागातील लताबाई दादाराव‎ अंबाड(५५) या साबला (ता. केज) येथे‎ आल्या होत्या. २ मार्च रोजी ४ वाजेच्या‎ सुमारास त्यांची बहीण जनाबाई गोरख काकडे‎ व त्या दोघी अंबाजोगाई कडे जाण्यासाठी‎ केजच्या बस स्थानकावर आल्या. येथील‎ बसस्थानाकातून त्या अगोदर छत्रपती संभाजी‎ नगर- अंबाजोगाई बसमध्ये चढल्या. बसमध्ये‎ भरपूर गर्दी असल्याने परत खाली उतरल्या.‎ त्यानंतर पुणे - अंबाजोगाई बसमध्ये बसल्या.

‎बहिणीच्या मुलास फोन लावण्यासाठी त्यांनी‎ पर्सकडे हात घातला असता पर्सची चैन‎ आर्धी उघडी दिसल्याने त्यामधील पैसे व‎ दागिन्यांची पर्स गायब दिसली. अज्ञात‎ चोरट्याने बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा‎ घेत त्यांची पर्स लांबवून त्यातील ४३ हजार‎ ५०० रुपये किंमतीचे चार ग्रॅमचे सोन्याची‎ अंगठी, दहा ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, पाच‎ ग्रॅमचे मनी, दहा ग्रॅमचे सोन्याचे सेवनपिस व‎ नगदी २० हजार रुपये असा ६३ हजार ५००‎ रुपयांचा ऐवज लंपास केला. लताबाई अंबाड‎ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध‎ गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार‎ सीमा निरडे करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...