आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:जिल्ह्यातील ठोक कृषी विक्रेत्यांना दुकाने उघडण्यास सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत परवानगी

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्य

बीड जिल्ह्यातील खते बि-बियाणे फर्टी लायजर दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे केली होती. क्षीरसागर यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करत त्यानुसार ठोक कृषी विक्रेत्यांना २१ ते २५ मे दरम्यान सकाळी ११ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत मुभा दिली आहे.

यंदा पावसाळी हंगाम हा चांगला होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून या वर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, तुर, मका, उडीद, मुग आदी पिकांची लागवड होणार असून जुन महिन्यात वेळेवर पाऊस पडेल असा अंदाज असून शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते खरेदीसाठी बीड जिल्ह्यातील खतांची दुकाने उघडी ठेवणे गरजेचे असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी वेळ मिळेल या बाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी असून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात यावी.अशी सूचना व मागणी शिवसेनेचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे केली होती त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन ही मागणी मंजूर केली आहे आता २१ ते २५ मे दरम्यान सकाळी ११ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत कृषी विक्रेत्यांना कार्यालयीन कामकाज व ठोक कृषी निविष्ठा विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे

खरीप हंगामाचा कालावधी पाहता व पेरणीचा काळ हा जवळ येत असून शेतकऱ्यांना बि - बियाणे व खते खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना निवेदनाद्वारे केली होती.ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आहे.

बातम्या आणखी आहेत...