आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमचे जे काही होते ते त्यांच्या जिवावर होते. आता तेच नसल्याने कसे जगावे, हा प्रश्न सतावत आहे. माझा चार वर्षांचा मुलगा आदित्य आणि मुलगी संध्या यांचे भविष्य आज अंधकारमय झाले असल्याचे सांगत शेतकरी नामदेव जाधव यांची पत्नी आरती यांनी आपल्या भावना मांडल्या. साखर कारखाना ऊस घेऊन जात नसल्याने गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतकरी नामदेव जाधव यांनी ऊस पेटवून देत नंतर त्याच शेतात गळफास घेऊन दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली.
नामदेव यांची पत्नी आरती यांचे पैठण तालुक्यातील रांजणगाव हे माहेर असून लहानपणीच त्यांचे मातृ-पितृछत्र हरपले. आता पतीनेही आत्महत्या केली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या उसाची साखर कारखान्याने लवकर तोड करावी, अशी मागणी सरपंच रमेश जाधव यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मस्कंेनी या कुटुंुबाला अकरा हजार रुपयांची मदत केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.