आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवाल:विधान परिषदेवर ख्रिश्चन समाजाला संधी का नाही; आशिष शिंदेंचा सवाल

बीड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतीच विधान परिषदेची दहा जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली. सर्व जाती धर्माला महाराष्ट्रात विधान परिषदेवर जाण्याची संधी देऊन त्या समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी नेतृत्वाला संधी दिली जाते. परंतु आतापर्यंत एकदाही मराठी भाषिक ख्रिश्चन नेतृत्वाला कोणत्याही पक्षाने विधान परिषदेवर प्रतिनिधित्व दिलेले नाही. अल्पसंख्यांक आयोग असो की महामंडळे कोठेच ख्रिश्चन समाजास राज्यस्तरावर प्रतिनिधित्व का मिळत नाही? असा सवाल अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदेंनी केला.

शिंदेंनी याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्रात तीस लाख मराठी भाषिक व आडनावाचे ख्रिश्चन नागरिक आहेत. परंतु, या ख्रिश्चन समाजाकडे कोणाचे लक्ष जात नाही. भारतात गेल्या वीस वर्षात राजकीय पक्ष ख्रिश्चन समाजाकडे राजकीय दुर्लक्ष करताना करताना पाहावयास मिळत आहे. ख्रिश्चन समाजाच्या अनेक समस्या आहेत. परंतु महाराष्ट्रात राजकीय नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे ख्रिश्चन समाजाचे प्रश्न आजही दुर्लक्षितच आहेत.

अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या माध्यमातून समाज संघटित करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळेच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आता समान न्याय या पध्दतीने ख्रिश्चन समाजालाही संधी देण्याची गरज आहे. राजकीय पक्षांनी केवळ समाजाला मतापुरते न वापरता प्रश्नही जाणून घ्यावेत, सोडवावेत, अशी मागणी आशिष शिंदे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...