आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतत पैशाची मागणी:विवाहितेस मारहाण, घरातून हाकलले; चौघांवर गुन्हा

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका २९ वर्षीय विवाहितेस पतीने आणि तिच्या सासरच्या लोकांनी सतत पैशाची मागणी करीत शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर मारहाण करून घरातून बाहेर हाकलून दिल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील भालगाव (ता. बार्शी) येथे घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. केज तालुक्यातील सारणी (सां.) हे माहेर असलेल्या पुनम शरद घुगे (२९) या महिलेचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील भालगाव (ता. बार्शी) येथील शरद आप्पा घुगे याच्याशी मार्च २०१४ मध्ये झाला होता.

लग्नानंतर पती आणि सासरच्या लोकांनी पूनम हिला चांगले नांदवले. २४ मार्च २०१९ पासून तुला मूल होत नाही असे म्हणत दवाखान्याच्या खर्चासाठी १ लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावून त्यावरून त्यांनी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्यानंतर तिचा पती शरद घुगे याने दारू व जुगाराचे कर्ज काढून पैसे खर्च केले. ते फेडण्यासाठी दोन एकर शेती व दागिने विकून भरपाई केली. १५ दिवसांपूर्वी न सांगता शरद घुगे हे पुण्याला निघून गेले. आठ दिवसाने परत आल्यावर पूनम हिने विचारणा केली असता त्याचा राग मनात धरून मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ करून २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता घरातून हाकलून दिले. माहेरी आल्यानंतर पूनम घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती शरद घुगे, सासरे आप्पा घुगे, सासु साखरबाई घुगे, दिर बंडु आप्पा घुगे या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार अभिमान भालेराव हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...