आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:पत्नी, मुलीचा गळा चिरून खून; पतीचीही आत्महत्या, सिरसाळा येथील घटना, कौटुंबिक वादातून प्रकार

सिरसाळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नी व दोनवर्षीय चिमुकलीचा गळा चिरून हत्या केल्यानंतर पतीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना परळी तालुक्यातील सिरसाळा येथे शुक्रवारी रात्री घडली. कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याची माहिती पोलिस सू़त्रांनी दिली.

अल्लाबक्ष अहमद शेख (२८) हे परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात वेल्डर म्हणून काम करत. ते सिरसाळ्यातील मोहा रोड परिसरात वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरातील सर्व सदस्य नातेवाइकाच्या विवाह सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते. घरी अल्लाबक्ष, पत्नी शबनम (२५) व दोन वर्षीय मुलगी अशफिया हे तिघेच होते. कुटुंबातील सदस्यांना विवाह सोहळ्यासाठी तुम्ही पुढे जा, आम्ही मागून येतो, असे अल्लाबक्षने सांगितले होते. मात्र ते गेलेच नाहीत.

रात्री १०:३० ते ११ वाजेच्या दरम्यान विवाह सोहळ्याला गेलेले कुटुंबीय परत आले तर त्यांना घर आतून बंद असल्याचे दिसून आले. आवाज देऊन, दरवाजा वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर घराचा पत्रा उचकटून काहींनी आत प्रवेश केला. शबनम व अशफिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे दिसले. जवळच अल्लाबक्ष हाही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती कळताच सिरसाळा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, कौटुंबिक वादातून अल्लाबक्षने हे टोकाचे पाऊल उचचल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...