आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला दोन मुलांसह घरातून:लाखासाठी पत्नीला घरातून हाकलून दिले

केज8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाडीचे हप्ते फेडण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन का येत नाहीस असे म्हणत पतीने आपल्या पत्नीला दोन मुलांसह घरातून बाहेर हाकलून देत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील आनंदगाव ( सारणी ) येथे घडली.

चंदन सावरगाव ( ता. केज ) माहेर असलेल्या मंगल ऋषिकेश गायकवाड ( वय ४० ) या विवाहितेचा २० वर्षांपूर्वी आनंदगाव ( सारणी ) येथील ऋषिकेश गणपत गायकवाड यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना रोहन व राहुल ही दोन मुले झाले. मंगल गायकवाड यांना तब्बल १९ वर्ष चांगल्या प्रकारे नांदविले. ३ एप्रिल २०२२ रोजी मंगल गायकवाड यांनी पतीला बाहेरील महिलांना फोनवर का बोलता व त्यांना फिरायला घेऊन का जाता अशी विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ करीत गाडीचे हप्ते फेडण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन म्हणून त्यांना पतीने तगादा लावला. तर मावस सासू भागीरथी सुभाष थोरात ( रा. बनकरंजा ता. केज ) यांनी तिला पैसे येऊन येईपर्यंत नांदवू नको. असे म्हणून सतत शिवीगाळ करीत होत्या.

मात्र तिने पैसे आणण्यास नकार दिल्याने चारित्र्यावर संशय घेत लाथाबुक्याने व चापटाने मारहाण करून घरातून हाकलून दिले. त्यांना व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. अशी मंगल गायकवाड या महिलेने दिल्यावरून पती ऋषिकेश गायकवाड, मावस सासू भागीरथी थोरात या दोघांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामधन डोईफोडे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...