आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिवरापहाडी गावाने कायम भाजपला मतदान केले आहे. ग्रामपंचायतीसाठी भाजप नेत्यांच्या माध्यमातून निधी देऊन गावाचा विकास करणार असल्याचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी सांगितले. तांदळे यांच्या हस्ते बीड तालुक्यातील हिवरापाडी येथील नूतन सरपंच अशोक सीताराम शिंदे उपसरपंच राजाभाऊ पालवे, ग्रा.पं.सदस्य कुंडलिक शिंदे, नवनाथ कांबळे, अमोल खरात,हनुमंत पांढरे यांचा संघर्षयोद्धा भाजपा संपर्क कार्यलय बीड येथे सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी ते बोलत होते. सर्जेराव तांदळे म्हणाले, बीड तालुक्यातील हिवरापाडी ग्रामस्थ कायम पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
लोकसभा असो अथवा विधानसभा कोणत्याही निवडणुकीत येथील मतदार बांधवांनी भरघोस मतदान करून विजयामध्ये सहभाग घेतला आहे. सरपंचाच्या थेट निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विचाराचे अशोक सीताराम शिंदे हे सरपंच पदावर निवडणून आले आहेत. गावातील रस्ते, नाली, पिण्याचे शुद्ध पाणी, लाईट, शाळा, आदि मुलभूत सुविधा नियमितपणे ग्रामस्थांना पुरवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. शासनाच्या विविध सार्वजनिक व वैयक्तिक योजना राबवून लोकांना योजनांच्या माध्यमातून मदतीचा आधार द्यावा. यासाठी युवा पिढीने तळमळीने काम केले पाहिजे हिवरापाडी गावाला विकास निधी कमी पडणार नाही. असा विश्वास भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. सर्जेराव तांदळे यांनी व्यक्त केला. यावेळी चंद्रकांत फड, शांतीनाथ डोरले, हरीश खाडे, वसंत गुंदेकर, बबनराव रूपनर, चेअरमन भारत रूपनर, कृष्ण पारखे, बाळू व्हरकटे, झनझन अमोल, निळकंठ वळे, प्रल्हाद वळे, भीमराव तुपे,अजित बोराडे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.