आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या संरचनात्मक कामांमुळे बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी कार्य करण्याची संधी मिळाली असून येत्या काळात बाल हक्क संरक्षण, प्रचलन करण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करणार असल्याची ग्वाही नूतन सदस्या अॅड. प्रज्ञा खोसरे यांनी दिली.
ऊसतोड कामगारांचा जिल्हा असलेल्या बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात महिला व बालकांच्या प्रश्नांसह विविध विषयांवर प्रभावी कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा संघटक अॅड. प्रज्ञा खोसरे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.
या निवडीनंतर त्यांनी पुढील कार्याची दिशा स्पष्ट केली. दरम्यान, अॅड.खाेसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध विषयांवर आतापर्यंत सातत्याने काम केलेले आहे. पक्ष संघटन विस्तारासह विविध धोरणात्मक विषयांवर त्यांचे असलेले काम पाहून ही निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर यांनी संयुक्तपणे अॅड. खोसरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यासह राज्यभरातून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील प्रश्न प्रभावीपणे पुढे येण्यास मदत
बीड जिल्हा हा ऊसताेड मजुरांचा जिल्हा असून या ठिकाणच्या बालकांचे विविध प्रश्न आहेत. राज्यभरात या ठिकाणहून स्थलांतर होते. त्यामुळे शिक्षणापासून निवासाचेही प्रश्न असतात. अॅड.प्रज्ञा खोसरे यांनी महिला व बालकांच्या विषयांवर यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम केलेले आहे. आता या कामाचा अनुभव हा येत्या काळात जिल्ह्यातील राज्य बाल हक्कांच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने उपयुक्त ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.