आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव संचालक मंडळाची निवडणूक येत्या काळात होणार असून ही निवडणूक अापण पूर्ण ताकदीने लढणार अाहाेत. या माध्यमातून कार्यकर्त्यांना पदावर बसवणयासाठी मेहनत घेणार अाहाेत, असे प्रतिपादन भाजप नेते माेहनराव जगताप यांनी केले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन मोहनराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव येथे खरेदी विक्री संघ सोसायटी गटातील मतदारांची बैठक पार पडली. याप्रसंगी खरेदी विक्री संघ निवडणूक लढण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, खरेदी विक्री संघ व बाजार समिती अनेक वर्षापासून सत्ताधारी गटाच्या ताब्यात असून केवळ निवडणूक आली की विरोधकांना शेतकरी व मतदारांची आठवण येते. या संस्थेमध्ये अनेक वर्षापासून विरोधकांनी भ्रष्टाचाराचे काम केले असून या निवडणुकीत सर्वसामान्यांना संधी देण्यासाठी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढणार आहे. नितीनराव नाईकनवरे म्हणाले, अागामी निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ असून निष्क्रिय लोकांच्या हातातील सत्ता जनता काढून घेणार अाहे. यावेळी नगरसेवक शरद यादव, श्रीकृष्ण सोळंके, एकनाथ डाके, माजी सभापती विठ्ठल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष यादव, नितीनराव काळे, डॉक्टर चव्हाण,वसंत अलकुंटे, फेरोज इनामदार, भाऊसाहेब गोंडे, रावसाहेब गायकवाड, रमेश मोरे, पापालाल राठोड, सरपंच अंगद कटके, पं.स. सदस्य पंडित काळे, भास्कर कचरे, जगदीशराव बादाडे, राजभाऊ थेटे, सदस्य, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.