आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावक्फ बोर्डाच्या मालमत्ता, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने नागपुरात झालेल्या वक्फ बोर्डाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुतवल्लींच्या ६५ प्रकरणावर यावेळी निर्णय घेण्यात आले तर कर्मचारी भरती बाबत निर्णय घेतल्याने हा मार्गही मोकळा झाला.
वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली नागपुर येथे वक्फ बोर्डाची बैठक घेण्यात आली. यावेळी बीड येथील सदस्य समीर काझी उपस्थित होते. बैठकीत बोर्डाचे कामकाज गतीमान व पारदर्शी होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिबीर घेण्याचे निश्चित करण्यात आले. ज्यामुळे लोकांचा पैसा आणि वेळ बचत होईल शिबिरात तत्काळ निर्णय करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी बोर्डाचे जबाबदार सदस्य, अधिकाऱ्यांची उपस्थिती असेल. ज्यामुळे तक्रार ऐकल्यानंतर निपटारा ऑन द स्पॉट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
वक्फ बोर्डात भरतीसाठी गतवर्षीचा शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता, १६९ अधिकारी, कर्मचारी, चतुर्थ श्रेणीमधील भरती आराखड्यात मान्यता देण्यात आली. रिक्त जागा भरल्या जातील व बोर्डाचे कामकाज गतीने होण्यास मदत होणार आहे. यावेळी नियम ३६ च्या मालमत्तांचे नोंदणीकरण, नियम-४३ चे अहवाल बदलाचे प्रस्ताव देखील मंजुर करण्यात आले. बैठकीला बोर्डाचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा, खा.फौजिया खान, हुसेन शाकेर, डॉ.मुदस्सीर लांबे, मौलाना हाफीज अथरअली, समीर गुलाम नबी काझी आदींची उपस्थिती होती.
आता अतिक्रमण, वादही निर्माण होणार नाही : काझी
वक्फ बोर्डाच्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असतानाही अपेक्षीत उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे वक्फ लिज रूल्स २०१४ मधील तरतुदीनुसार बोर्डाच्या खुल्या जागा दिर्घ मुदतीसाठी भाडे तत्त्वाने देवून बोर्डाला अधिक सक्षम करण्याचा व बोर्डाचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यामुळे मालमत्ता वर होणारे अतिक्रमणही होणार नाही आणि वादही निर्माण होणार नाहीत असे बीड येथील सदस्य समीर काझी यांनी सांगितले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.