आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:योग्य मार्गदर्शन, संधी मिळाल्यास मुलींमध्ये दडलेली शक्ती पुढे येते; सेवानिवृत्त न्यायाधीश रवींद्र बोर्डे यांचे प्रतिपादन

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास मुलींमध्ये दडलेली ताकद बाहेर पडेल. प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर राहतील. घरामध्ये सुद्धा पालकांनी मुलींबद्दल भेदभाव करू नये, असे प्रतिपादन औरंगाबाद उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश रवींद्र बोर्डे यांनी केले.

योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी व श्रीमती कमल खुरसाळे न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या महिला आत्मभान शिबीराच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी रविवारी (ता.८ मे २०२२) ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सुरेश खुरसाळे होते. यावेळी संस्था उपाध्यक्ष ॲड. शिवाजीराव कराड, संस्थेचे सचिव गणपत व्यास गुरुजी, कोषाध्यक्ष प्रा. माणिकराव लोमटे, संस्था पदाधिकारी एन. के. गोळेगावकर, यशोदा राठोड, भीमाशंकर शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. सेवानिवृत्त न्यायाधीश रवींद्र बोर्डे म्हणाले, घरी संस्कार घडवताना पालकांकडून मुलगा - मुलगी याची जाणीव करून देणे चुकीची बाब आहे.अजिबात भेदभाव करायला नको. सध्याच्या पिढीमध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसून येतात. तरुण विवाहित मुले आपल्या पत्नीला घरातील कामांसाठी मदत करतात. ही बाब स्वागतार्ह आहे. मुलींसाठी घेण्यात आलेली शिबिरे प्रेरणादायी आहेत.ज्याप्रमाणे मुलींसाठी आत्मभान शिबिरे घेण्यात येतात, त्याचप्रमाणे मुलांसाठी सर्वभान शिबिरे घ्यावेत, जेणेकरून मुलांना सामाजिक भान राहील, असे मत बोर्डे यांनी यावेळी व्यक्त केले.

मुलींमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळावी. स्वरक्षण करता यावे, यासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने मुलींसाठी आत्मभान शिबिरे गेल्या तेरा वर्षापासून आयोजित केली जातात. मुलांसाठी सुद्धा सर्वभान शिबिर आयोजित केले जातील, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे समन्वयक प्रा.प्रवीण भोसले यांनी केले. सहशिक्षिका शिवकन्या साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्व शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पदाधिकारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. या शिबिरातील मुलींनी योगासने, काठी - लाठी, तलवारबाजी, कराटे, बॉक्सिंग इत्यादी वेगवेगळे प्रात्यक्षिके करून दाखवले. शिबिरातील विद्यार्थिनी सायली जोशी, जागृती विर्धे यांनी शिबिराबाबत मत व समाधान व्यक्त केले.

समानतेचे बीज पेरले जाणे हेच सर्वात महत्त्वाचे
आजच्या काळात मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. नव्या पिढीतील मुलेही मुलींना समजून घेतात. कामाची समसमान वाटणी करून घेतात. यातून समानतेचे बीज पेरले जात आहे. ही बाब अतिशय कौतुकास्पद असून प्रत्येक महिला, मुलीला समान अधिकार मिळण्याची गरज आहे, असे मत सेवानिवृत्त न्यायाधीश रवींद्र बोर्डे यांनी मांडले. इतर मान्यवरांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...