आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बीड:छळास कंटाळून महिलेची 3 वर्षीय मुलासह आत्महत्या; पती, सासू-सासऱ्यांवर गुन्हा

गेवराई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने ३ वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरूर तालुक्यातील फुलसांगवी येथे सोमवारी घडली. रेखा बद्रीनाथ तळेकर (२३) व संकेत बद्रीनाथ तळेकर (३) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी रेखाचा पती, सासू, सासऱ्यासह अन्य एकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार झाले आहेत.

गेवराई तालुक्यातील चिखली येथील रेखाचा विवाह पाच वर्षांपूर्वी शिरूर तालुक्यातील फुलसांगवी येथील बसवाहक बद्रीनाथ तळेकर याच्याबरोबर झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले नांदवल्यानंतर सासरी तिचा शारीरिक व मानसिक छळ होऊ लागला. या त्रासाबद्दल रेखाने माहेरच्या लोकांना सांगितले हाेते. २७ जुलै रोजी रेखा ३ वर्षांच्या संकेतला बरोबर घेऊन घराबाहेर पडली. नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. शेवटी सोमवारी रात्री ८ वाजता गावापासून जवळपास असलेल्या एका विहिरीत तिचा व अाणि संकेतचा मृतदेह सापडला. चकलांबा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.