आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रूरतेचा कळस:दगडाने ठेचून महिलेचा निर्घृण खून, केज तालुक्यातील जानेगाव येथील घटना

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका ३८ वर्षीय महिलेचा दगडाने चेहरा ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना जानेगाव (ता. केज) येथे गुरुवारी (दि.२५) रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेच्या तपासासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र कुठलेही धागेदोरे हाती लागले नव्हते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी युसूफवडगाव पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जानेगाव येथील अनुरथ चटप हे पत्नी आशाबाई यांच्यासह गावापासून दीड किमी अंतरावर जुन्या केज रस्त्यावर शेतात वास्तव्यास आहेत. मुलाचे अभियांत्रिकीचे तर मुलीचे बी फार्मसीचे शिक्षण सुरू आहे. शिक्षणाच्या निमित्ताने त्यांची मुले केज शहरातील घरी राहतात. त्यांचे आई, वडील, भाऊ गावात राहतात. चटप दांपत्य हे स्वतःची आणि नातेवाइकांची काही जमीन वहिती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. शेतीला जोडव्यवसाय म्हणून दोन म्हशीचे पालन करून दुग्धव्यवसाय करीत होते.

गुरुवारी रात्री अनुरथ चटप म्हशीचे दूध काढून दूध तेे गावातील डेअरीवर देण्यासाठी गेले होते. घरी त्यांची पत्नी आशाबाई (३८ ) एकट्याच होत्या. रात्री त्यांच्या मुलाने आईचा फोन उचलला जात नसल्याने वडिलांना फोनवर याची माहिती दिली. अनुरथ यांनी घरी पाहिले तर त्या दिसल्या नाहीत. त्यांनी बॅटरीच्या उजेडाने परिसरात पाहिले. घरापासून २०० ते २५० फूट शेतात बोरीच्या झाडाखाली आशाबाई यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेला होता. दगडाने ठेचून त्यांचा खून झाल्याचे दिसत होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे, सपोनि विजय आटोळे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. आशाबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला होता. मात्र तो अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोलिस उपअधीक्षकांची भेट
उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांंना तपासाविषयी मार्गदर्शन केले. शुुक्रवारी सकाळी मृत महिलेचे वडील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा युसूफवडगाव पोलिसात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विजय आटोळे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...