आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार:माजलगाव तालुक्यामध्ये महिलेवर बलात्कार

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पात्रूड येथील एका २७ वर्षीय महिलेवर घरात रात्री घरात घुसून बलात्कार केल्याची घटना रविवारी मध्यरात्री १ वाजता घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पात्रुड येथे २७ वर्षीय विवाहिता आपल्या मुलासह ३१ डिसेंबर रोजी घरात झोपली होती. यादरम्यान रात्री १ वाजता अचानक घराचा दरवाजा वाजवला. यावर महिलेने कोण आले हे पाहण्यासाठी दरवाजा उघडला. यावर शेख ताहेर हा जबरदस्तीने घरात घुसून महिलेचे तोंड दाबून रूममध्ये ओढत नेऊन गेला. यावेळी महिलेच्या गालावर बोचकुरे ओढत बळजबरीने बलात्कार केला. आरडाओरडा केलाच तर तुझ्या लेकरांना जीवे मारील, असे धमकावत अत्याचार केला. यावेळी आवाजाने घरातील मुले उठली असता त्यांच्या ओरडण्याचा आवाजाने शेजारील नागरिक धावले. यावर ताहेर शेख हा तेथून पळून गेला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...