आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:मारहाण केल्याने महिलेचा हात फ्रॅक्चर ;साबला येथे तीन जणांना लोखंडी खीळने मारहाण

केज15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेत आमचे आहे म्हणत लोखंडी खीळने मारहाण केल्याने महिलेचा हात फ्रॅक्चर झाला. तर भांडण सोडवण्यास आलेल्या बापलेकासही मारहाण केल्याची घटना साबला (ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल झाला. साबला (ता. केज) येथील मंदाकिनी दशरथ मुळे (६०) या ९ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शेतात होत्या. या वेळी महादेव आश्रूबा मुळे, शिवाजी आश्रूबा मुळे, आश्रूबा रामभाऊ मुळे, विमल आश्रूबा मुळे, कल्पना महादेव मुळे हे तिथे आले.

त्यांनी तुमचे हे शेत नाही, आमच्या बापाच्या नावावर आहे असे म्हणत शिवीगाळ करत महादेव व शिवाजी यांनी लोखंडी खीळने हातावर, पाठीवर व डोक्यात मारहाण केली. यात मंदाकिनी मुळेंचा हात फ्रॅक्चर झाला असून डोके फुटले. त्यांचे पती व मुलगा भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करून महिलेच्या केसास धरून मारहाण केली, अशी फिर्याद मंदाकिनी मुळेंनी दिल्यावरून पाच जणांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस नाईक दिलीप गित्ते हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...