आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:महिलेचे डोके फोडले; पिता-पुत्राविरोधात गुन्हा

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तू शेतात यायचे नाही’ असे म्हणत दोघा बापलेकांनी एका महिलेस शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करीत डोक्यात लाकूड मारत डोके फोडल्याची घटना कानडीमाळी (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

कानडीमाळी येथील अर्चना नवनाथ आगरकर (२५) ही २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात काम करीत होती. याचवेळी तिच्या भावकीतील रामा मारूती आगरकर व त्याचे वडील मारूती आगरकर हे दोघे या महिलेकडे आले. त्यांनी ‘तू शेतात यायचे नाही’ असे कारण काढून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. ‘शेतात आलीस तर जीवे मारून टाकू’ अशी धमकी त्यांनी दिली. अशी तक्रार अर्चना आगरकर यांनी दिल्यावरून रामा आगरकर, मारुती आगरकर या बापलेकांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास पोलिस नाईक त्रिंबक सोपणे करताहेत.

बातम्या आणखी आहेत...