आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:दारूबंदीसाठी महिला आक्रमक‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गावात दारुविक्री होत असल्याने‎ मद्यपींचा सुळसुळाट झाला असून‎ याचा महिलांना त्रास सहन करावा‎ लागत आहे. दिवसेंदिवस दारु‎ पिणाऱ्यांचा त्रास वाढत असल्याने‎ माजलगाव तालुक्यातील‎ फुलेपिंपळगाव येथील महिलांनी‎ एकजुट दाखवून आक्रमक पावित्रा‎ घेतला. संतप्त महिलांनी गुरुवारी‎ (दि.२) बीड येथील राज्य उत्पादन‎ शुल्क कार्यालयात ठिय्या मांडत‎ दारुबंदीची मागणी केली.

यावेळी‎ कार्यालयीन अधीक्षकांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.‎ फुलेपिंपळगाव येथे दारुविक्री‎ होत असल्याने गावातील तरुण‎ पिढीमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण‎ वाढत आहे. दारुच्या आहारी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जाऊन पती-पत्नीमध्ये वाद होत‎ आहेत. याचा विपरीत परिणाम‎ मुलांवर होत असून महिलांनाही‎ याचा त्रास सहन करावा लागत‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...