आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सक्लुझिव्ह:असंघटित कामगारांसाठीच्या ई-श्रम कार्ड नोंदणीत महिला आघाडीवर; शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक

अमोल मुळे | बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी सुरू केलेल्या ई-श्रम कार्ड नोंदणीत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानी आहे. दरम्यान, राज्यातील एकूण नोंदणीच्या ५५% नोंदणी शेतकऱ्यांची असून एकूण नोंदणीत ५० टक्क्यांहून अधिक महिला आहेत. १८ ते ४० या वयोगटातील ५७% कामगारांनी नावे नोंदवली आहेत, तर पन्नाशी ओलांडलेल्या केवळ १५ टक्के कामगारांची नोंदणी झाली आहे. राज्यातून झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

देशातील असंघटित कामगारांची संख्या स्पष्ट व्हावी आणि या कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या मार्फत ई-श्रम पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिले जाते. असंघटित क्षेत्रात, म्हणजेच बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर हे या कार्डसाठी अर्ज करू शकतात. त्यांना २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जातो.

विविध योजनांचे लाभ देणारे ई-श्रम कार्ड
असंघटित क्षेत्रांतील कामगारांना कुठल्याही सामाजिक योजनांचा लाभ मिळत नाही. तो मिळावा म्हणून ई-श्रम कार्ड सुरू करण्यात आले. यात ऑनलाइन नोंदणी होते. १६ ते ५९ वर्षे वयोगटातील व्यक्ती अर्ज करू शकते. ईपीएफ किंवा आयकर भरणारे अर्ज करू शकत नाहीत. नोंदणीनंतर १२ अंकी युनिक कोड असलेले कार्ड मिळते.

काय मिळतो लाभ?
हे श्रम कार्ड आधारसोबत लिंक आहे. यातून असंघटित कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहोचवण्याचा उद्देश आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण. अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख, आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतो.

बातम्या आणखी आहेत...