आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:आरटीओ कार्यालयातील  महिला लिपिक निलंबित ; बीड ग्रामीण ठाण्यात गुन्ह्याची नोंद

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुसऱ्या राज्यातील वाहनाचे बनावट कागदपत्र तयार करुन व आरटीओची बनावट स्वाक्षरी करुन वाहनाची नोंदणी केल्या प्रकरणी आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल यांना परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी निलंबित केले. सुरेखा डेडवाल यांनी आरटीओ कार्यालयातील दलालाशी संगनमत करुन परराज्यातील वाहन (क्र. एपीओ एपी २२८३) हे बनावट पद्धतीने मोटर वाहन निरीक्षक आणि नोंदणी प्राधिकारी यांच्या खोट्या स्वाक्षरी करुन ऑनलाइन प्रणालीवर नोंद केले होते. ही बाब उघडकीस आल्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांच्या तक्रारीवरुन सुरेखा डेडवाल आणि एजंट सय्यद शाकेर यांच्यावर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...