आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:सोशल मीडियावर मैत्रिणीचा जाच; तरुणाची आत्महत्या, बहिणीने दिली महिलेविरोधात तक्रार

धारूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नाची गळ घालून जमीन, ट्रक नावावर करण्यासाठी तगादा; धारूर तालुक्यातील घटना

साेशल मीडियावरून महिलेशी झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर महिलेने दीपक सुभाष सांगळे या अविवाहित तरुणाला लग्नासाठी गळ घातली आणि जमीन, ट्रक तिच्या नावावर करण्याची मागणी केली. हे शक्य न झाल्याने महिलेने तरुणाला त्रास देण्यास सुरुवात केली. याच त्रासातून दीपकने आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेसह अन्य एका मित्रावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कासारी फाटा येथील दीपक सांगळे हा स्वमालकीचा ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दीपकची पुणे येथील विवाहित महिला आरतीबरोबर साेशल मीडियावर सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. ती दीपकला मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून दीपकने दोरीने गळफास घेतल्याचे शनिवारी (दि. ५) सकाळी उघडकीस आले. अशी तक्रार दीपकची बहीण शीतल दिगंबर घुगे हिने दिली आहे.

महिलेला मोबाइल देणारा तरुणही सहआरोपी

या गुन्ह्यात दीपकला पुणे येथील आरतीचा मोबाइल उपलब्ध करून देणाऱ्या धारूर येथील ज्ञानेश्वर बाबासाहेब मुर्गीकर यालाही या प्रकरणात सहभागी असल्यामुळे सहआरोपी करण्यात आले अाहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे करत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser