आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून समोर येणे आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय महिलांच्या उद्धारासाठी दुसरा मार्ग नाही. त्यामुळे मुलींनी बालविवाहाला विरोध करून उच्चशिक्षण घ्यावे. समाजाचे आणि पालकांचे मुलींविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मुलींनीच पुढाकार घ्यावा. पुरुषांचेच वर्चस्व असलेल्या राजकारणात महिलांनी हस्तक्षेप करून स्वतःला सिद्ध करावे. माझा बालविवाह झाला नाही.
मला राजकारण करताना महिलांची साथ मिळाली आणि म्हणून मी सरपंच होऊ शकले असे प्रतिपादन धोंडराई येथील सरपंच शीतल साखरे यांनी केले. र. भ. अट्टल महाविद्यालय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रासेयोचे सात दिवसीय निवासी शिबिर रेवकी - देवकी येथे सुरु असून यावेळी बालविवाह बंदी आणि ग्राम विकासात महिलांचे योगदा या विषयावर साखरे बोलत होत्या. रानमळा येथील माजी सरपंच नंदा हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर गायिका रेखा जोशी, गायक प्रा. सुनील मुंडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
एकाहून एक सरस चित्रपट गीतांची सुरेल मेजवानी गावकऱ्यांना या निमित्ताने मिळाली. ''इतनी शक्ती हमे देना दाता'' या प्रार्थनेनंतर ''अधीर मन झाले'', ''रुपेरी वाळूत'', ''निसर्ग राजा'' अशी बहारदार गाणी सादर झाल्यानंतर ''ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख में भरलो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी'' या गीताने समारोप करताना मैफलीत देशभक्तीचे चैतन्य निर्माण झाले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून भगवान देवकते व कमळाजी यमगर, प्रा. संदीपान हिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकऱ्यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिरार्थींनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन, आभार, प्रास्ताविक केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.