आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीशाळा घेत मार्गदर्शन:श्रीपतरायवाडीत महिलांनी घेतले कृषिविषयक धडे

अंबाजोगाई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुधारित कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शेतीशाळा हे प्रभावी माध्यम असल्याने तसेच शेती व्यवसायामध्ये महिलांचा मोलाचा वाटा असल्याने कृषी विभागाने महिलांच्या शेतीशाळा घेण्यावर विशेष भर दिलेला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील श्रीपतरायवाडी येथे महिलांसाठी विशेष शेतीशाळा घेत मार्गदर्शन करण्यात आले.उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हा उपक्रम पार पडला.

उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी शेतीशाळा घेऊन सोयाबीनवरील चक्रीभुंगा, खोडमाशी, पिवळा मोझॅक विषाणू प्रादुर्भाव, अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळी झालेली पाने यांची निरीक्षणे दाखवून व्यवस्थापनाचे उपाय सुचवले. यावेळी शेतीशाळा प्रशिक्षक दशरथ उबाळे, मुरलीधर जाधव, श्रीकन्या जाधव, सविता जाधव, सोनाली जाधव, सुनीता जाधव, संगीता पवार, पंचफुला जाधव, उज्वला पवार, पारूबाई पवार, हिराबाई शिंदे, पवन जाधव, बाळासाहेब जाधव, रंगनाथ पवार, पवार, पंकज जाधव, मीना जाधव हजर होत्या.

बातम्या आणखी आहेत...