आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:वंचितच्या महिला आघाडी कार्यकारिणीची बैठक

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त महिला जिल्हा कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय आढावा बैठक शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे हे होते तर जिल्हध्यक्ष उद्धव खाडे यांनी सविस्तरपणे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना अशोक हिंगे म्हणाले, आगामी काळात होऊ घातलेल्या सर्वच निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी यांनी सज्ज राहावे व गावपातळी पासून ते शहर पातळीपर्यंत संघटनात्मक बांधणीवर भर द्यावा त्याच बरोबर,गावातील स्थानिक पातळीवरचे सर्व समस्या प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करावा व जनतेशी प्रश्न सोडवावे जेणे करून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला जनतेसमोर जाता येईल असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला बीड, गेवराई, माजलगाव, शिरूर, येथून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीस जिल्ह्याचे महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर सहसचिव पुरुषोत्तम वीर, अनुरथ वीर, युनुस शेख,बबन वडमारे, अनंत सरवदे, एस.एस.सोनवणे, गोरख झेंड, भीमराव राठोड, अंकुश जाधव, सुदेश पोतदार, बालाजी जगतकर, गणेश खेमाडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अॅड.अनिता चक्रे, महासचिव कल्पना गोरे, उपाध्यक्ष पुष्पा तुरुकमाने, जिजाताई साळवे, नंदा भंडारे, दिपाली तांगडे, राजश्री लांडगे, सुरेखा जाधव, प्रज्वल वंजारे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...