आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्याविष्कार स्पर्धा:बीड येथे आज नृत्याविष्कार महिलांचा; अभिनेत्री अनुष्का सरकटे राहणार हजर

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कल्पतरू बीड यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘नृत्याविष्कार महिलांचा’ या नृत्य स्पर्धेसाठी अभिनेत्री अनुष्का सरकटे उपस्थित राहणार असल्याची माहिती कल्पतरूच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांनी दिली.

बीड येथील केएसके महाविद्यालयाच्या परिसरात रविवारी (ता. ३१ जुलै) दुपारी चार वाजता होणाऱ्या “नृत्यविष्कार महिलांचा” या नृत्य स्पर्धेसाठी ‘कारभारी लय भारी’ फेम अभिनेत्री अनुष्का संजय सरकटे उपस्थित राहून पारितोषिके वितरित करणार आहे. बीड येथील कल्पतरू या संस्थेतर्फे ही स्पर्धा दोन गटात होणार असून वैवाहिक महिला व आई मुलगा/ मुलगी असे दोन गट असणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ असे पारितोषिके असणार आहे. अनुष्का सरकटे ही अभिनेत्री “लक्ष्मीनारायण” या मालिकेत लक्ष्मीच्या मुख्य भूमिकेतुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. यात लक्ष्मी आणि अललक्ष्मी असे दोन पात्र तिने साकारले आहे. ही मालिका ओडिशी भाषेतही डब झाली आहे. त्यानंतर “मी तुझीच रे” या मालिकेत दिव्या व “कारभारी लय भारी” मधील पियू (प्रियंका) ह्या भूमिका साकारल्या आहे. “बंगला” हा कोळीगीतांचा अल्बमही तिचा प्रसिध्द झाला आहे. दरम्यान, बीड येथील महिलांना प्रोत्साहन आयोजित या स्पर्धेसाठी हजर राहून ती मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक तथा कल्पतरू संस्थेच्या अध्यक्षा, लेखिका तथा प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर, सोनल पाटील, अनिता शिंदे आणि अनुष्का सरकटे आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...