आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्या. घुगे यांचे प्रतिपादन:महिला सक्षमीकरणाचा हेतू स्त्री-पुरुष समानता

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिला सक्षमीकरणाचा हेतु पुरुष प्रधान समाजाचा महिला प्रधान समाज बनवणे हा नाही तर स्त्रीया आणि पुरुष दोहोंनी प्रधान व्हावे. स्त्री - पुरुष समानता हाच महिला सक्षमीकरणाचा मुख्य हेतू आहे असे मत न्या.संजय घुगे यांनी व्यक्त केले.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भ. अट्टल महाविद्यालय येथे महिला समानता दिन झाला. या निमित्ताने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे महाविद्यालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गेवराई येथील दिवाणी न्या. संजय घुगे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सह दिवाणी न्या. वानखडे, गेवराई तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. अमित मुळे, वकील संघाचे सचिव ॲड. मडके, महाविद्यालय विकास समिती सदस्य तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एच. एस. पाटील, ॲड. वैद्य, ॲड वावरे, ॲड. योगेश पाटील इत्यादींची उपस्थिती होती.

न्या. संजय घुगे यांनी पोस्को, ॲसिड हल्ला यावर बोलताना त्या संदर्भातील कायदे आणि शिक्षा याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच सह दिवाणी न्या. वानखडे यांनी महिला सक्षमीकरण संदर्भातील कायदे सांगितले. महाविद्यालयाच्या प्राचार्य रजनी शिखरे यांनी अध्यक्षीय समारोपात म्हणाल्या, फक्त महिलाच नाही तर पुरुषांनी देखील महिला विषयक कायदे आणि त्याचे पालन याविषयी जागृत होण्याची आवश्यकता आहे. प्रास्ताविक डॉ. वृषाली गव्हाणे यांनी केले. डॉ. सुदर्शना बढे यांनी सूत्रसंचालन केले डॉ. मिना नागवंशी यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी डॉ. अमोल शिरसाठ, डॉ. वर्षा जयसिंगपुरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ. समाधान इंगळे, प्रा. अरुण जाधव यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...