आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांनी गॅस दरवाढी विरोधात चुलीवर भाकरी करून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात अंबाजोगाई येथे निदर्शने केली. दिवसेंदिवस घरगुती, व्यवसायीक सिलेंडरच्या दरात वाढ होत आहे. यामुळे महिलांचे पूर्ण गणित कोलमडून गेले आहे. तसेच अवकाळी पावसाने देखील शेतीचे अतोनात नुकसान झाले असल्याने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे महाराष्ट्र सचिव माणिक आदमाने यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
यावेळी समाधान जोगदंड, राजेभाऊ आदमाने,हारून पठाण, भारत होके, अविनाश ओव्हाळ, लक्ष्मण वाघे, अॅड. वसंत हजारे, प्रकाश शिंदे, प्रकाश मस्के, अमोल आदमाने, मुजाहिद सयद, राहुल शिंदे, सुदाम कणसे, ॲड. चंद्रशेखर निकाळजे, रुपाबाई ओव्हाळ, जलसाबाई आदमाने, पाकिजा पठाण, नियकात पठाण, मीरा कणसे, सुरेखा गवळी, अॅड. छाया ढगे, सविता आदमाने, मीरा ठोंबरे, रमा हजारे, मोहिनी ओव्हाळ, कोमल आदमाने, आशा आदमाने यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.