आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधारुर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये ऊस पिकावर पांढऱ्या तसेच काळ्या प्रकारच्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव एक ते दीड महिना होत वाढत आहे. यावर अनेक उपाययोजना करूनही लोकरी मावा कमी होत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. धारूर तालुक्यामध्ये ५ हजार हेक्टरवर उसाचे क्षेत्र आहे. गतवर्षी अतिरिक्त उसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. ऊस कारखान्याला कसा घालावा असा शेतकऱ्यांना प्रश्न होता. तोडणी कारखान्याला नेई पर्यंत ५० टक्के पेक्षा अधिक शेतकऱ्यांना खर्च आला होता. या मुळे कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या खोड्यावर नांगर फिरवला होता.यावर्षी उसाला बऱ्यापैकी भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
२७०० रुपये क्विंटल प्रमाणे भावही काही कारखान्यांनी जाहीर केले आहेत.धारूर तालुक्यामध्ये अरणवाडी, चोरंबा, आंबेवडगाव, गावंदरा,सोनीमोहा , जहागीरमोहा, घागरवाडा, पहाडी दहिफळ, चारदरी,भोगलवाडी, भोपा, मोहखेड आदी गावच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे.मागील एक ते दीड महिन्यापासून ऊस पिकावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा लोकरी मावा पांढऱ्या व कळ्या रंगाच्या स्वरूपाचा आहे. यामुळे उसाची वाढ खुंटली आहे. शेतकऱ्यांनी यावर विविध प्रकारच्या फवारण्या करूनही हा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे दिसत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळी उपाय योजना साठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
फवारणी करूनही प्रादुर्भाव कमी होईना उसावर मागील काही दिवसापासून नोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. विविध औषधाची फवारणी करूनही हा प्रादुर्भाव कमी होत नाही. लोकरी माव्यामुळे उसाची वाढ खुंटलेली आहे. ़- बालासाहेब दराडे, शेतकरी, सोनिमोहा लोकरी माव्यामुळे उसाचे पीक धोक्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.