आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल:पुतळा परिसरात कामाला सुरुवात; रस्त्याच्या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायपास ते बायपास या शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. रविवारपासून शहरातील मुख्य भाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेने दिली. शहरातील जालना रोड ते बार्शी रोड या दरम्यान काकू नाना रुग्णालय ते सोमेश्वर मंदिर परिसरात सध्या सिमेंट रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. रविवारपासून शहरातील प्रमुख भाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात कामाला सुरुवात केली.

यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत.नगररोड भागातून जालना रोडला जाणाऱ्या नागरिकांनी नगर नाका-कॅनॉल रोड ते रिलायन्स पेट्रोल पंप या मार्गाने जावे. तर, जालना रोडवरून नगर रोडला जाण्यासाठीही बायपासच्या याच रस्त्याचा अवलंब करावा. सुभाष रोड, माळीवेस या भागातील नागरिकांना बसस्थानक परिसरात यायचे असल्यास माळीवेस-धोंडीपूरा-बलभीम चौक-राजुरी वेस-बशीरगंज-जय भवानी चौक या रस्त्याचा वापर करावा. सुमारे १५ दिवसांपर्यंत हा बदल असणार आहे

बातम्या आणखी आहेत...