आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असुविधा:सीओंअभावी रखडली कामे; स्वच्छतेकडे‎ दुर्लक्ष; नागरिकांचीही कामे होईनात‎

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगर परिषदेला कायमस्वरूपी‎ मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील‎ अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.‎ स्वच्छतेचे टेंडर घेतलेल्या ठेकेदाराच्या‎ मनमानी कारभारामुळे शहरात सर्वत्र‎ घाणीचे साम्राज्य पसरले आहे.‎ पाणीपुरवठा विभागही सुस्त झाला‎ असून जलवाहिनी दुरुस्ती होत‎ नसल्याने अनेक रस्त्यांना तळ्याचे‎ स्वरूप आले आहे. प्रभारी नियुक्ती‎ झालेले बीड नगरपालिकेचे‎ मुख्याधिकारी माजलगावला येत‎ नसल्याने माजलगाव शहरात समस्यांचा‎ डोंगर निर्माण झाला आहे.‎ माजलगाव नगर परिषदेला कायमचे‎ मुख्याधिकारी पदाचे वावडे असल्याने‎ कधीच दीर्घकाळ मुख्याधिकारी राहिले‎ नाहीत. एव्हाना येथील सत्ताधारी‎ नागराध्याक्षांनाही ते नकोच असल्याने‎ मागील अनेक वर्षांपासून येथील ‎नगरपालिका सीओंसाठी ‘आओ जाओ‎ घर तुम्हारा’ अशीच अवस्था झाली‎ आहे.

दोन वर्षांपूर्वी मुख्याधिकारी‎ पदाचा कायमस्वरूपी पदभार घेतलेल्या विशाल भोसलेंचा कार्यकाळ कायम ‎वादग्रस्त राहिला. पालिकेचे टेंडर‎ स्वतःच्या भावाच्या नावावर दिल्याचा‎ ठपका ठेवत मागील दीड महिन्यापूर्वी‎ त्यांची येथून बदली झाली होती. त्यानंतर ‎येथील पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा ‎ ‎ प्रभारी पदभार बीड नगरपालिकेचे ‎ ‎मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे.

त्यांच्याकडे पदभार गेल्यापासून ते ‎कधीतरी माजलगाव पालिकेत येत असल्याने पालिकेचा कारभार रामभरोसे ‎झाला आहे.‎ मुख्याधिकारीच जागेवर नसल्याने ‎ ‎ शहरातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले ‎आहेत. स्वच्छता टेंडर घेतलेल्या‎ ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे‎ शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग‎ साचले असून तुंबलेल्या नाल्यांचे‎ पाणीही रस्त्यावरून वाहू लागल्याने‎ नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा‎ लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या‎ दुर्लक्षामुळे पाइपलाइनला ठिकठिकाणी‎ लागलेली गळती दुरुस्त होत नसल्याने‎ शहरातील मुख्य रस्त्यालाही तळ्याचे‎ स्वरूप आले आहे.

शहरातील गोळा‎ केलेला कचरा शहरालगतच असलेल्या‎ सिंदफणा नदीच्या कडेला टाकला जात‎ असल्याने दुर्गंधी पसरली आहे.‎ शहरातील मुख्य रस्त्यावरच मोकाट‎ जनावरांचा कळप थांबत असल्याने‎ वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा‎ सामना करावा लागत आहे. पालिकेत‎ मुख्याधिकारी नसल्याने कार्यालयीन‎ कर्मचाऱ्यांना कोणताच धाक राहिला‎ नाही. परिणामी नागरिकांची कामेही‎ मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत.‎ यामुळे पालिकेला कायमस्वरूपी‎ मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी‎ नागरिकांतून होत आहे.‎

नियमित आढावा घेतो‎ मी
दररोज विविध विभागांतील‎ कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या कामाची‎ माहिती घेत असतो. सध्या शहरात‎ बऱ्यापैकी स्वच्छतेची व इतर कामे सुरू‎ आहेत, असे प्रभारी मुख्याधिकारी उमेश‎ ढाकणे यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...