आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशोवार्ता:शेलापुरीतील मल्ल सुमीतकुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत देशात अव्वल, 68 किलो वजन गटात मिळवून दिले महाराष्ट्राला सुवर्णपदक

माजलगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा (राज्य बिहार) येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शेलापुरी (ता. माजलगाव) येथील मल्ल सुमीतकुमार अप्पासाहेब भारस्कर याने देशात अव्वल क्रमांक मिळवला. १५ वर्षे वयोगटातील ६८ किलो वजन गटात झालेल्या या स्पर्धेत सुमीतने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.

शेलापुरी येथील ऊसतोड मजूर पहिलवान अप्पासाहेब भारस्कर यांचे चिरंजीव सुमीतकुमारने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वडील अप्पासाहेब व चुलते पहिलवान कल्याण भारस्कर यांनी सुमीतकुमारला कुस्तीचे धडे दिले. तसेच सुमीतकुमार पुणे येथील रुस्तुम-ए-हिंद पै.अमोल बुचुडे व सध्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सोबत असणारे आनंदकुमार व नरेंद्रकुमार यांच्या मार्गदर्शनात सराव करत होता. सचोटी व आपल्या पालकांची कुस्तीतील असलेली रुची पाहत सुमीतकुमारने डावपेचांवर लक्ष केंद्रित केले. यातून राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले.

माजलगावकरांच्या शिरपेचात तुरा
ग्रामीण भागात असणाऱ्या शेलापुरीसारख्या गावातील पहिलवान अप्पासाहेब भारस्करांचा मुलगा सुमीतकुमार भारस्कर यांनी बिहार येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्याने माजलगावकरांच्या शिरपेचात सुवर्णपदकाचा तुरा रोवल्याची भावना नागरिक व्यक्त करताहेत.

बातम्या आणखी आहेत...